Wed. Oct 27th, 2021

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना समन्स

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना समन्स बजावण्यात आला आहे. कोरेगाव भीमा आयोगाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. यानुसार शरद पवारांना येत्या ४ एप्रिलला आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

कोरेगाव भिमामध्ये २०१८ ला दंगल झाली होती. या हिंसाचाराची चौकशी या आयोगाकडून केली जात आहे. यासंपूर्ण प्रकरणाबाबत शरद पवारांची आयोगाकडून साक्ष घेण्यात येणार आहे.

भीमा कोरेगाव घटनेनंतर १८ फेब्रुवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली होती.

आत्तापर्यंत कोरेगाव भीमा मध्ये कोणताही वाद नव्हता. पण संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी वेगळं वातावरण निर्माण केलं, असं शरद पवार यावेळी म्हणाले होते. त्यामुळे ही माहिती पवारांकडे कुठून आली याबाबतची चौकशी केली जाणार आहे.

या कोरेगाव भिमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे असणार आहेत. कोरेगाव भिमा प्रकरणात शरद पवारांचीही साक्ष नोंदवली जाणार असल्याचं या आधीच सांगण्यात आलं होतं. अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी आयोगाकडे शरद पवार यांची साक्ष घेण्यात यावी यासाठी मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *