Fri. Apr 16th, 2021

क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ क्रीडा मनोसपचारतज्ञ भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी संध्याकाळी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. महात्मानगर येथे व्याख्यान देत असताना त्यांचे निधन झाले. 

 

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, नेमबाज अंजली भागवत, रिशुसिंग, कविता राऊत, गगन नारंग यांच्यासह अनेक खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले होते.
 

क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून भीष्मराज बाम यांचं नाव क्रीडा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतलं जातं. ऑलिम्पिकसह अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम यांनी मार्गदर्शन केले आहे.

 

मार्ग यशाचा, संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती, विजयाचे मानसशास्त्र, मना सज्जना, यांसारखी पुस्तकंही भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचं हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला. याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले.

 

1963 साली महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपाधीक्षक म्हणून ते रुजू झाले. 18 वर्षाच्या सेवेनंतर त्यांची गृहमंत्रालयात महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे ते पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झाले. पोलिस मासिक ‘दक्षता’चे ते दोन वर्षे मुख्य संपादकही होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *