Wed. Oct 27th, 2021

खड्ड्यांचा तुम्हाला राग येत नाही का ?; राज ठाकरेंचा भिवंडीकरांना प्रश्न

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून सर्व राजकीय पक्ष प्रचार सभा घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिवंडीमध्ये सभा सुरू असून यंदाही पावसाचे सावट होते. मात्र तरीही राज ठाकरे यांनी सभा घेत सरकारवर टीका केली आहे. एकीकडे संपूर्ण राज्य सत्तेसाठी धावत असून राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर जनतेचे हाल होतात. सरकारने झोडलं की पावसाने झोपडलं तर तक्रार कोणाकडे करायची अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. भिवंडीत सभेसाठी येताना रस्त्यात खड्डे बघून प्रश्न पडला की तुम्हाला राग कसा येत नाही ? हतबल लोकांचं नेतृत्व करायला आवडतं नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?

सगळे सत्तेच्या मागे धावत असून सक्षम विरोधी पक्ष हवा आहे. त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष हवा असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

भिवंडीत येताना खड्डे बघितल्यानंतर लोकांना राग कसा येत नाही असा सवाल जनतेसमोर राज ठाकरेंनी उपस्थित केला.

गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याचा आम्हाला राग येत नाही, निवडणुका म्हणजे फक्त धमाल अशी परिस्थिती आहे.

भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडत असून देशात सुद्धा अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत आणि आपण काहीच वाटून घेत नाही आहोत

पीएमसी आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार हक्काचे पैसे मागत असून बॅंका बुडत आहेत तरीही तुम्हाला राग येत नाही का ?

भिवंडी मधील विजेचा प्रश्न,टोरेंट नावाची कंपनी गुजरात मधून आली आणि लुटायला सुरुवात केली.

भिवंडीकरांनी भाषणांना टाळ्या द्यायच्या ऐवजी ती एक टाळी टोरेंटच्या अधिकाऱ्याच्या गालावर मारली तर परिस्थिती सुधारेल असा राज ठाकरे म्हणाले.

राज्यात नाशिक वगळता सगळीकडे खड्डे आहेत. टक्केवारी बंद केल्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही.

राज्य सरकार ३० % सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार, उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकर पण नरक्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *