पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
उत्तर प्रदेश हे पाच आंतराष्ट्रीय विमानतळ असलेले देशातले पहिले राज्य ठरणार आहे. नोएडा विमानतळ हे दिल्ली एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. विमानतळाचा पहिला टप्पा २०२४पर्यंत पूर्ण होणार आहे.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण ३३०० एकर जमिनिवर तयार केले जाणार असून या विमानतळावर एकूण ५ धावपट्टी असणार आहेत. पहिल्या टप्प्यात २ धावपट्टी तयार केल्या जातील. तसेच दुसऱ्या टप्प्यात ३ धावपट्टी तयार केल्या जाणार आहेत.