Tue. Sep 27th, 2022

नवी मुंबईत भूमिपुत्रांचा मेळावा

नवी मुंबईत भूमिपुत्रांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीद्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला नवी मुंबईतील तमाम प्रकल्पग्रस्त हजेरी लावणार आहेत.

दुसरीकडे १३ जानेवारीला दि.बा.पाटील यांच्या जयंतीनिमित्त विमानतळ नामकरण परिषदेचे आयोजनही करण्यात आले आहे. याच परिषदेच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी आजच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या मेळाव्यात विमानतळ नामकरण आंदोलनाच्या दुसऱ्या सत्रासंदर्भात एल्गार होणार आहे.

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. भूमिपुत्रांकडून नवी मुंबई विमान तळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. मंगळवारपासून नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलनाची जुळणी सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.