भुसावळमध्ये नगरसेवकावर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू तर 4 जखमी

भुसावळ येथील भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह चार जणांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या गोळीबारात भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात, सुनील खरात (भाऊ), सागर खरात ( मुलगा), रोहित खरात यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. तसेच चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं ?
भुसावळचे भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर तीन जणांनी मिळून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.
रवींद्र खरात यांच्यासह त्यांचा भाऊ सुनील खरात, मुलगा सागर खरात, रोहित खरात यांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली.
रविवारी रात्री रवींद्र खरात यांच्या घराच्या अंगणात तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला.
यावेळी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या खरात कुटुंबियांचा गोळीबारात चार जणांना मृत्यू झाला असून अजून चार जण गंभीर जखमी आहेत.
रवींद्र खरात यांचा भाऊ सुनील खरात आणि मुलगा सागर यांचा जागीच मृत्यू झाला असून रवींद्र खरात आणि त्यांचा रोहित खरात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तसेच रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, मुलगा हितेश आणि आणखी एक मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
मात्र या हल्ल्यामुळे भुसावळ शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.