Wed. Jan 19th, 2022

भुशी डॅम मध्ये पर्यटक कुटुंब पाण्यात अडकलं!

पावसाळ्यात लोणावळयातील भुशी डॅम बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र गेल्या काही दिवसात पडत असलेल्या पावसामुळे भुशी धरणाने रौद्र रूप धारण केले आहे.

पावसाळ्यात लोणावळयातील भुशी डॅम बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र गेल्या काही दिवसात पडत असलेल्या पावसामुळे भुशी धरणाने रौद्र रूप धारण केले आहे. यामध्ये पर्यटक कुटुंब पाण्यात अडकलेलं होतं. त्याला वाचविण्यात यश आलं आहे. मात्र असाच पाऊस चालू राहिला तर काही दिवसात पर्यटकांना धरण परिसरात फिरण्याची बंदी येऊ शकते.

भुशी डॅमने घेतले रौद्र रूप

लोणावळयात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रस्ते, नाले, नदी ओसंडून वाहू लागले आहेत.

लोणवळ्यातील आकर्षण असलेल्या भुशी धरणाने रौद्र रूप धारण केले होतो. सायंकाळी 5 नंतर लोणावळा पोलिसांनी भुशी धरण परिसरात नाका बंदी केली होती.

पोलीसांना पर्यटकांनी धरणाकडे फिरकूही दिले नाही,असाच पाऊस चालू राहिला तर काही दिवसात पर्यटकांना धरण परिसरात फिरण्याची बंदी येऊ शकते.

भुशी डॅम मध्ये काल एक पर्यटक कुटुंब पाण्यात अडकलेलं होतं. तितक्यात पाण्याचा प्रवाह वाढला. हे कुटुंब आतच राहीले. हे कुटुंब मदतीची याचना करू लागलं. पण कोणीच पुढे यायला तयार नव्हतं.

यावर पोलीस कर्मचारी मुंडे आणि उमेश मराठे या धाडसी तरुणाने शक्कल लढवली. धरणाच्या खाली बचाव पथक थांबवण्यात आलं.

मग या सर्वांना पाण्यात उड्या घ्यायला लावल्या आणि त्यांना खाली सुखरूप बाहेर काढण्यात आले.

उमेश मराठे या धाडसी तरुणाने आणि पोलीस कर्मचारी मुंडे यांनी स्वतःचा जीव घालत कुटुंबियाला वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *