Tue. Dec 7th, 2021

प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन

मुंबई 13 जून: संपूर्ण जगात आता देखील कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा संसर्ग इतका वाढला की रुग्णालयात रुग्ण ठेवण्यासाठी जागा नव्हती. अगदी नामांकित सेलिब्रिटीना देखील कोरोनाचा सामना करवा आता नुकतच प्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम यांच्या कुटुंबाला सुद्धा कोरोनाचा सामना करावा लागला आहे. या स्थितीत भारतीय प्रेक्षकांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. (Indian comedian Bhuvan Bam) भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. भुवन बाम हा प्रसिद्ध युट्युबवर असून त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून नेटकरी हळहळतायेत. आजवर एकाही बॉलिवूड़ चित्रपटात काम न केलेल्या भुवनच्या पालकांसाठी सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहली आहे. भुवन बाम हा एक प्रसिद्ध भारतीय युट्यूबर आहे. भुवन बाम हा मोठ्या युट्यूबर्सपैकी एक आहे. आजच्या तारखेला तब्बल 20 कोटी नेटकरी त्याला दररोज युट्यूबवर फॉलो करतात. तसेच लिंकडिन, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतरत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे आणखी जास्त फॉलोअर्स आहेत. भुवन हा पाच ते सात मिनिटांचे विनोदी स्किट्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. तसेच त्याच्या स्किटचे विषय हे तरुणांच्या आयुष्यावर आधारित असतात. त्यामुळं फारच कमी वेळात त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. खरं तर भुवनला एक संगीतकार होण्याची इच्छा होती. मात्र त्याला संगीतकार म्हणून कुठेच काम मिळालं नाही त्यानंतर त्याने एका पबमध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली. या पबमध्ये काही स्टँडअप कॉमेडीचे शो देखील केले जायचे. त्या विनोदी कलाकारांना मिळणारी दाद पाहून आपणही असं काहीतरी करावं असं त्याला वाटू लागले. त्यानं यासाठी काही प्रयत्न केले पण त्याला विनोदवीर म्हणून पबमध्ये काम मिळत नव्हतं. त्यानंतर भूवन याने स्वत:चं एक युट्यूब चॅनेल सुरु केलं अन् तिथं तो विनोदी स्किट्स सादर करायचा. हळूहळू त्याची ती स्किट्स प्रेक्षकांना आवडू लागल्या. भूवनने पहिल्यांदा भारतात नाही तर पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध मिळवली होती. त्यानंतर त्याला भारतात सुद्धा हळूहळू प्रसिद्ध मिळू लागली. अन् आज तो सर्वात लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक आहे. सध्या भुवन स्टँडअप कॉमेडीसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्ये वॉईज ओव्हर देण्याचं देखील काम करतो. त्यानं आतापर्यंत डेडपूल, कॅप्टन अमेरिका, कॅप्टन मार्व्हल या चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. आज भुवनसोबत काम करण्यासाठी अनेक नामांकित सेलिबेब्रिटी उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *