Sat. May 15th, 2021

जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधीचा मार्ग मोकळा झाला

राष्ट्राध्यक्षपदासाठी अमेरीकन निवडणुकीत काँग्रेस डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांची भारी मताने विजयी ठरले. आता येत्या २० जानेवारीला शपथविधीचा मार्ग त्यांचा मोकळा झाला असून दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. बायडेन यांना एकूण ३०६ इलेक्टोरल कॉलेजची मते मिळाली होती.

आजही माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केला. मात्र अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे. जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवडयांच्या आता सत्तेचे हस्तांतरण होईल असे ट्रम्प यांनी सांगितले. सत्ता हस्तांतरणासाठी ट्रम्प तयार झाले असले तरी निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *