Wed. May 18th, 2022

धनंजय मुंडेंना मोठा धक्का; काँग्रेसने भाजपसोबत केला घरोबा

राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केज नगरपंचायतीमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र आली असून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा मिळाल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

केज नगरपंचायतीसाठी खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघडी एकत्र आली असून सत्ता स्थापन करणार असल्याचे, काँग्रेस नेते आदित्य पाटील आणि जनविकास आघाडीचे नेते हारून इनामदार यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

केज नगरपंचायत निवडणुकीत जनविकास आघाडी ८, राष्ट्रवादी ५, काँग्रेस ३ तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले. मात्र कोणालाच बहुमत मिळाले नाही. दरम्यान, राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन करणार असून मंत्री धनंजय मुंडे यांना काँग्रेसकडून मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.