Sat. Sep 21st, 2019

Big Boss Marathi 2चा शिव ठाकरे ठरला विजेता

0Shares

Big Boss Marathi 2चा विजेता रोडीज फेम शिव ठाकरे ठरला असून अंतिम फेरीतील सोहळा वीणा जगताप, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर यामध्ये रंगला होता. यापैकी नेहा शितोळे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे टॉप थ्री स्पर्धेक होते. मात्र अंतिम फेरीत वीणा जगताप घराबाहेर पडल्यानंतर नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये रंगला.

शिव ठाकरेने पटकवला विजेतेपदाचा मान –

अमरावतीमधून आलेला शिव ठाकरेने Big Boss Marathi 2चा विनर ठरला आहे.

नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये अंतिम सोहळा पार पडला.

यापूर्वी शिवने रोडीज हा रिअॅलिटी शो केला आणि त्यामधून त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

वीणा जगताप आणि शिवमध्ये असलेले नाते नेहमीच चर्चेचा विषय ठरली.

बिग बॉसच्या घरी 100 दिवस पूर्ण केल्यानंतर टॉप थ्री स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगली.

बिग बॉसच्या घरात सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणार व्यक्ती म्हणजे शिव ठाकरेची ओळख.

त्यातच वीणा आणि शिवमध्ये चांगली मैत्री जमली आणि प्रेमसंबंधही जुळले.

बिग बॉसनंतर लग्न करणार असल्याचेही बिग बॉसमधील पत्रकार परिषदेत दोघांनी म्हटलं आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *