Fri. Aug 12th, 2022

उदयनराजेंनंतर आता आदित्य ठाकरेंना अभिजीत बिचुकलेंचं आव्हान!

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघात शिवसेनेतर्फे खुद्द आदित्य ठाकरे उतरणार आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे ते पहिले सदस्य आहेत. त्यांच्याविरोधात काका राज ठाकरे यांनी मनसेतर्फे उमेदवार उतरवला नाही. मात्र अशा परिस्थितीत आदित्य यांच्याविरोधात एक नवा अपक्ष उमेदवार उभा राहतोय. तो म्हणजे बिग बॉस मराठी 2 मधील स्पर्धक अभिजीत बिचुकले…

अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरेंविरोधात!

साताऱ्याचे अभिजीत बिचुकले हे वरळी मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत.

यासाठी त्यांनी आज उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

‘मीच आदित्य यांच्या विरोधात निवडून येणार’ असा विश्वास बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला आहे.

आदित्य यांना कोणताही मोठा विरोधक नव्हता.

इतर कोणत्याही पक्षाने मोठा उमेदवार इथे न दिल्याने आदित्य यांचा जास्त मतांनी विजय होणार हे निश्चित मानले जात आहे.

आता अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

यापुर्वी बिचुकले यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

तसंच राष्ट्रपतीपदासाठीदेखील त्यांनी अर्ज केला होता. बिग बॉस मराठी 2 कार्यक्रमात तर ते स्वतःचा उल्लेख वारंवार भावी मुख्यमंत्री असा करायचे.

त्यामुळे आता आदित्य ठाकरेंविरोधात त्यांना किती मतं मिळतायत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.