Jaimaharashtra news

Bigg Boss Marathi 2: शेफ पराग कान्हेरे बाहेर

बिग बॉस मराठी सीजन 2 मध्ये सारखे राडे होत असतात. गुरुवारी बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्येही असाच राडा झाला. यामुळे घरातून शेफ पराग कान्हेरे याला बाहेर काढण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. नेहाच्या कानशीलात लगावल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

बिग बॉस मराठी सीजन 2 मध्ये राडा

बिग बॉस सीजन 2 मध्ये काही ना काही भांडण सुरूच असतात. गुरूवारी पण टास्कच्या वेळी जोरदार राडा झाला आहे.

बिग बॉस च्या घरातून शेफ पराग कान्हेरे  याला बाहेर काढण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.
नेहाच्या कानशीलात लगावल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
टिकेल तो टिकेल या टास्क दरम्यान परागला उठवण्यासाठी विरुद्ध टीमचे नेहा, वैशाली, माधव प्रयत्न करत होते.
त्या वेळेस झालेल्या ढकलाढकलीत पराग नेहाच्या अंगावर पडला आणि त्यावेळी परागने नेहाशी असभ्य वर्तन केल्याचं बोललं जात आहे.
Exit mobile version