Sat. Aug 17th, 2019

बिहारमध्ये जिल्हाधिकाऱ्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या

0Shares

वृत्तसंस्था, बिहार

 

बिहारमधल्या जिल्हाधिकाऱ्यानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. बक्सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुकेश पांडेंनी रेल्वेखाली आत्महत्या केली.

 

मुकेश पांडे पाटण्याहून दिल्लीला आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुटुंबाला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला तसंच चिठ्ठीही लिहिली.

 

आत्महत्येची माहिती माझ्या नातेवाईकांना द्या, असं म्हणत 4 नातेवाईकांचे नंबर दिले. तसंच दिल्लीत राहत असलेल्या हॉटेलमधल्या खोलीत त्यांच्या बॅगेत आणखी एक सुसाईड नोट असल्याचंही सांगितलं.

 

या सुसाईड नोटमध्ये काय नमूद करण्यात आलं, हे अद्याप कळलेलं नाही. त्यांच्या आत्महत्येचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *