बिहारमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु
बिहार कुणाचे…

बिहारमधील निवडणूक तीन टप्प्यात झाली आहे आणि आता सुद्धा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने मोठी आघाडी घेतली होती. पण आता आकडेवारी बदललेली आहे.
आता सध्या भाजपा आणि जेडीयू पुढे आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये बरेच अंतर आहे. बिहारमध्ये भाजपाला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळू शकतात आणि असचं चालत राहिलं तर बिहारमध्ये भाजपा मोठ्या मताने निवडून येऊ शकते. कारण जेडीयूपेक्षा भाजपाचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर आहेत.
भाजपाने १२१ जागा तर जेडीयूने १२२ जागा लढवल्या आहे आणि बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. २०१५ मध्ये भाजपा आणि जेडीयूने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र त्यात भाजपाला यश आलं नव्हतं यावेळी आकडे खूप काही सांगत आहे काही वेळातचं बिहार निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.