पंतप्रधान मोदींनी बिहारसह देशातील जनतेचे आभार व्यक्त केले
मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार कायम राहणार – मोदी

नवी दिल्ली – बिहारमधील निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी बिहारसह देशातील जनतेचे आभार व्यक्त केले. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास हेच बिहार विजयाचे रहस्य आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास करू, असं म्हणत मोदींनी यावेळी म्हटलं आणि मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार कायम राहणार असल्याचे संकेत देखील दिले आहेत. धन्यवाद बिहार कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी बिहारसह देशाचा विकास करू असं म्हटलं आहे.
२१ व्या शतकाच्या भारतीय नागरिक वेळोवेळी आपला स्पष्ट संकेत देत आहेत. आता सेवेची संधी त्यालाच मिळेल जे देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत आणि सर्व राजकीय पक्षांकडून जनतेला हीच अपेक्षा आहे.