Mon. Jul 22nd, 2019

चक्क पाण्यावर चालते ‘ही’ बाईक !

0Shares

पाण्यावर चालणाऱ्या बाईकविषयी तुम्ही ऐकलं आहे का हो ? पेट्रोलऐवजी पाण्याने बाईक चालवण्याचा प्रयोग करत तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीला उत्तर दिले आहे. या प्रयोगामुळे बाईक चक्क पाण्यावर चालणार आहे.

पेट्रोलऐवजी पाण्यावर चालणारी बाईक

दिवसेंदिवस पेट्रोल -डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.

या इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे वाहने कशी चालवणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

यावर तेरणा इंजिनीअरिंग कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी उपाय शोधला आहे.

इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेचा उपयोग करत या विद्यार्थ्यांनी बाईक पाण्यावर चालवण्याचा प्रयोग केला.

या प्रक्रियेत एक बॅटरी, मीठ घातलेलं पाणी, धातूच्या रॉडचा उपयोग करत त्यातून हायड्रोजन गॅस तयार केला जातो .

हा गॅस रिकाम्या बाटलीमध्ये जमा करून तो दुचाकीच्या कॉर्बोरेटरमध्ये सोडला जातो.

यानंतर बाईकला किक मारल्यास बाईक सुरू होते.

हायड्रोजन गॅस हा अत्यंत ज्वलंत असल्याने त्यावर थोडी प्रक्रिया करून कॉर्बोरेटरमध्ये गॅस सोडता येतो.

पेट्रोल आणि डिझेल हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे आता विजेवर चालणाऱ्या गाड्या बाजारात येऊ लागल्या आहेत.

हाच विषय हाताळात हिमांशू पेडणेकर, सिद्धार्थ जोशी, सतिश आंबेटकर, या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी  पाण्यावर चालणाऱ्या या दुचाकीचा प्रकल्प तयार केला आहे.

पाण्यासारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोताचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषणमुक्त पर्यावरण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे हे पाऊल नक्कीच महत्तवाचे ठरले आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: