Sun. Jun 20th, 2021

‘Bikini हायकर’चा दरीमध्ये गारठून मृत्यू!

उंच पर्वतमाथे, डोंगरदऱ्यांमधून trekking करणाऱ्या गिगी वू या महिलेचा trekking दरम्यानच मृत्यू झाला आहे. Social Media प्रसिद्ध असणारी गिगी वू उंच पर्वतराजी सर करण्यासाठी निघाली होती. हा trek देखील ती bikini घालूनच करत होती.

कोण होती ‘Bikini’ हायकर?

गिगी वू ही तैवानची सुप्रसिद्ध trekker होती.

ती वू-चि-यून नावानेही प्रसिद्ध होती.

Bikini घालून trek करण्याची तिला सवय होतीय.

या trekking चे ती अनेक ग्लॅमरस फोटो social media वर पोस्टही करत असे.

तरुणांमध्ये Bikini हायकरची लोकप्रियता लक्षणीय होती.

तिचं वय 36 वर्षं होतं

कसा झाला ‘Bikini’ हायकरचा मृत्यू?

गिगी वू ईवान येथील युशान या बर्फाळ पर्वतावर हायकिंगसाठी गेली होती. हा trek ही ती bikini घालूनच करत होती. Trek दरम्यान 65 फूट खोल दरीमध्ये ती कोसळली. या अपघातात ती जबर जखमी झाली. सॅटेलाइट फोनद्वारे तिने या गोष्टीची कल्पना आपल्या मित्राला दिली. मित्राने ताबडतोब आपत्कालीन विभागाला फोन करून गिगीच्या मदतीसाठी यंत्रणा पुरवण्याचं आवाहन केलं.

यानंतर आपत्कालीन विभागाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गिगूचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. मात्र हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर गिगूपर्यंत पोहोचू शकत नव्हते. सुमारे 28 तासांच्या शोधानंतर दरीमध्ये गिगीचा मृतदेह आढळून आला.

खरंतर दऱ्याखोऱ्यांत, किंवा जंगलांमध्ये trekking करताना आपल्या सुरक्षेसाठी पुरेसे कपडे असणं आवश्यक असतं. बर्फाळ जागी trekking करताना ऊबदार कपडे हे must असतात. मात्र गिगी वू ने अक्षरशः बिकिनीवरच हा trek  करायचं ठरवलं. मात्र हा trek तिचा अखेरचा trek ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *