Jaimaharashtra news

बिल गेट्स यांचा घटस्फोट

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा गेट्स २७ वर्षांनंतर वेगळे होणार आहेत.बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न १९९४ साली झालं होतं. बिल यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.


‘बऱ्याच चर्चेनंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवलं. आम्ही एक फाऊंडेशन तयार केलं जे जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगलं राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे’, असं म्हटलं आहे.

‘आम्ही कारण सांगू शकत नाही मात्र हे लग्न मोडावं लागत आहे’, असं बिल आणि मेलिंडा यांनी सिएटलमधील दाखल केलेल्या संयुक्त याचिकेमध्ये म्हटलं आहे. फाउंडेशनमधील आपली जबाबदारी आणि पद कायम ठेवणार आहेत. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ने हे दोघे घटस्फोट घेणार असले तरी फाउंडेशनमध्ये बिल हे अध्यक्ष असणार आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करणार आहेत. मेलिंडा सध्या फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

Exit mobile version