Sun. May 16th, 2021

बोईसरमध्ये जैववैद्यकीय कचरा खुलेआम कचराकुंडीत

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोईसरमधील चिन्मया रुग्णायालाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे . बोईसरमधील चिन्मया रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असून या रुग्णालयात सध्या २० ते २५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत . मात्र या रुग्णालयातील जैववैद्यकीय कचरा खुलेआम ग्रामपंचायतच्या कचराकुंडीत टाकला जात असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रुग्णालयात वापरण्यात येणारे पीपीइ किट, सलाईन,सुया, वापरलेले बँडेड यांची विल्हेवाट न लावता कचराकुंडीत टाकले जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांमध्ये आहे . सध्या पालघरसारख्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना पहायला मिळत असून रुग्णालयांच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

बोईसर ग्रामपंचायतकडून चिन्मया रुग्णालयाला नोटीस देण्यात आली असून पुन्हा अशी बाब आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे .

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *