सैन्यातील निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोविड संकटात सैन्यदलाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आणि तयारीचा आढावा घेतला. ‘सर्व सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना परत बोलावण्यात आले आहे. दोन वर्षांत निवृत्त झालेले किंवा व्हीआरएस घेतलेल्या असे सर्व वैद्यकीय अधिकारी कोविड दरम्यान काम करण्यास तयार आहेत’, असं सीडीएस बिपिन रावत म्हणाले.

‘वैद्यकीय अधिकाऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की त्यांनी ऑनलाईन सेवा सल्लागार म्हणून मेडिकल इमरजेंसी हेल्पलाईनमध्ये काम करावे’, असं सीडीएस बिपिन रावत यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.

‘तिन्ही दलाकडून रुग्णालयांना ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करुन देत येत आहे. याशिवाय लष्कराचे नर्सिंग स्टाफही तैनात केले गेले आहेत. देशभरातील केंद्रीय आणि राज्य सैन्य वेलफेअर बोर्ड देखील लोकांच्या मदतीसाठी सैनिकांसोबत समन्वय करत आहे’, असंदेखील सीडीएस बिपिन रावत यांनी मोदींना सांगितले.

 

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version