Jaimaharashtra news

रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याने घेतला रेल्वे महिला पोलिसाचा चावा

वडाळा रेल्वे पोलिसांच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने कर्तव्यावर तैनात असताना चावा घेतल्याची घटना घडली.वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे. कुर्ला स्थानकातून हे कर्मचारी हार्बर मार्गावरून जात असताना हा प्रकार घडला आहे.

…म्हणून घेतला चावा

वर्षा गायकवाड या वडाळा रेल्वे पोलिसात महिला कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांच्या सोबत चेंबूर ते वडाळा अस घातपात गस्त घालत होते.

कुर्ला स्थानकातून हे कर्मचारी हार्बर मार्गावरून जात असताना हा प्रकार घडला आहे.

वर्षा ही महिला डब्यात बसल्या असता डीआरएम कार्यालयात कामाला असणाऱ्या प्रियांका मोरेंनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

यावर वर्षा यांनी जिटीबी नगर स्थानकात आल्यावर त्यांना खाली उतरवून कारवाही करणार असल्याचे सांगितले.

खाली उतरत असतांना प्रियांका यांनी वर्षा यांच्या हाताला जोरात चावा घेतला.

त्यांनी प्रियांका यांना वडाळा पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

Exit mobile version