Fri. Apr 19th, 2019

BJP आमदाराचं मतदारांना चक्क 2 वेळा मतदान करायचं आवाहन!

89Shares

नवी मुंबईतील भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांना चक्क दोन वेळा मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

दोनवेळा मतदान करा!”

कोपरखैरणे येथे युतीच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती.

दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असून पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मतदारसंख्या नवी मुंबईत वास्तव्यास आहे.

विशेषतः माथाडी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांना सातारा येथे जावून शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांना 23 एप्रिल रोजी मतदान करण्याचे सांगितलं.

तर परत 29 एप्रिल रोजी ठाणे लोकसभेचं मतदान असल्याने परत येऊन शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

शरद पवारांच्या वक्तव्याशी तुलना!

मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शरद पवार दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन करू शकतात, तर आपण का नाही करायचं, असं वक्तव्यही मंदा म्हात्रे यांनी केलं.

दरम्यान याप्रकरणी आता विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याची तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *