Thu. Dec 12th, 2019

राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक

वृत्तसंस्था, बनासकांठा

 

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. हा हल्ला करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली.

 

जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव आहे त्याला धनेरा इथून अटक करण्यात आली. जयेश हा बनासकांठामधला भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. त्याच्यासह आणखी तिघांनाही अटक करण्यात आली.

 

दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तत्पूर्वी राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली. कारवर झालेल्या हल्ल्याच्या मागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *