Tue. May 17th, 2022

राज्यभरात नाना पटोलेंविरुद्ध भाजपा

काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी असा नामोल्लेख करत केलेले ताजे वक्तव्य पुन्हा वादात सापडले आहे. यामुळे, नाना पटोले यांच्याविरोधात भाजपाने पुन्हा राज्यभरात वक्तव्य सुरु केली आहेत. नाना आपल्या मूळ वक्तव्यावरून मागे हटायला तयार नाहीत आणि त्यातच नवनवी वादग्रस्त तसेच बेताल वक्तव्य करत असल्याने भाजपाने त्यांच्याविरोधात महाराष्ट्रात आंदोलन पुकारले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिकमध्ये बोलताना नाना पटोले यांनी ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते, असे म्हटले. त्यामुळे पटोलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड मिळाले आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाली असून मुंबई, पुणे येथे नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलने काढण्यात आली.

मुंबईचे भाजपचे ‘गोमूत्र पाजा’ आंदोलन

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वकत्व केल्यामळे भाजप आक्रमक झाली आहे. मुंबईत भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली गोमूत्र पाजा असे आंदोलन करण्यात आले. नाना पटोले यांच्या पोस्टरला गोमूत्र पाजून त्यांना शुद्ध करण्यात आले असल्याचे, प्रसाद लाड यांनी सांगितले.

डोंबिवलीमध्ये भाजपची घोषणाबाजी

डोंबिवलीमध्ये भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकासमोर स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांना अक्कल नसून ते डोक्यावर पडलेला राजकारणी नेता असल्याचे वक्तव्य शशिकांत कांबळे यांनी केले आहे.

पुण्यात भाजपचे आंदोलन

नाना पटोले यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यात भाजपने अलका चौक येथे नाना पटोले यांच्याविरोधात निदर्शने केली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, नाना पटोल यांना काँग्रेसने अंडर ऑफझरवेशनमध्ये ठेवायला पाहिजे. नाना पटोले देशाच्या पंतप्रधानांवर टीका करत आहेत. पटोलेंचा हेतू काय आहे? पटोलेंची शारीरीक आणि मानसिक तपासणी करावी लागेल, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.