Sun. Sep 19th, 2021

भाजपाचे उदित राज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

LokSabha Election 2019 च्या पार्श्वभूमीवर नाराज उमेदवार नव्या पक्षाच्या शोधात आपल्या स्वपक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. आता यामध्ये भाजपचे उदीत राज यांचाही समावेश झाला आहे. भाजप पक्षाकडून  मिळणाऱ्या निराशाजनक वागणुकीमुळे त्यांनी भाजपमधून काढता पाय घेतला होता. दिल्लीच्या उत्तर पश्चिम या त्यांच्या भागातून उदीत राज यांच्या नावाची चर्चा होत होती, मात्र त्यांच्याऐवजी भाजपचे उमेदवार हंसराज हंस यांचे नाव पुढे केले गेले. यामुळे उदित राज हे पक्षावर नाराज होते. त्यामुळे उदित राज यांच्या पक्षत्यागाच्या चर्चेला उधाण आले होते. यावर त्यांनी आज शिक्कामोर्तब करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

उदित राज यांचा काँग्रेस प्रवेश

निवडणुकांच्या धर्तीवर नाराज असलेले उमेदवार नव्या पक्षामध्ये जाताना दिसत आहेत.

यामध्ये आता भाजपचे उमेदवार उदित राज यांचाही समावेश आहे.

भाजपकडून दिल्लीत उदित राज यांना उमेदवारी दिली नाही.

भाजपाने  गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिल्याने उदित राज हे पक्षावर नाराज होते.

यासंबंधी उदितराज नव्या पक्षामध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगत होती.

त्यात उदितराज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत, या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

तेव्हा आता उदितराज हे यापुढे काँग्रेस पक्षातून निवणूक रिंगणात उतरतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *