Wed. May 12th, 2021

वडाळा मतदारसंघात जागेवरून वाद; शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांनी पुकारले बंड

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असून राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही उमेदवारांची यादी जाहीर केली असून  वडाळ्याच्या जागेवरून मोठा वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वडाळ्यात युतीमुळे बदल ?

भाजपने वडाळ्याच्या जागेसाठी कालिदास कोळंबकरांचे नाव जाहीर केले आहे.

यावर शिवसेनेच्या नगरसेविका श्रध्दा जाधव यांनी जागेवर आपलाच हक्क असल्याचा दावा करत बंड पुकारला आहे.

भाजप आणि शिवसेनेत झालेल्या युतीमुळे ही जागा शिवसेनेने भाजपला दिल्याचे म्हटलं जात आहे.

अनेक वर्षांचे स्वप्न भंग …

श्रद्धा जाधव अनेक वर्षापासून शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

त्यांना या पदाबरोबरच विधानसभेवर जाण्याचे स्वप्न होते. मात्र आता शिवसेनेच्या या निर्णयामुळे हे स्वप्न भंग होत असल्याचे दिसत आहे.

यानंतर जाधव यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

श्रद्धा यांनी यापूर्वी महापौर या पदाचाही कार्यभार सांभाळला आहे.

वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकरांचा चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असल्याने ते ७ वेळा निवडणूक जिंकले आहेत.

यामुळे कोळंबकरांना वडाळ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *