Sat. Jul 31st, 2021

भाजपाची चौथी यादी जाहीर, ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज राजकीय पक्ष शेवटची यादी जाहीर करत आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज राजकीय पक्ष शेवटची यादी जाहीर करत आहेत. आज अनेक दिग्गज आज आपले अर्ज भरणार आहेत. भाजपाने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांची नावे चौथ्या यादीत ही जाहीर न केल्याने यांचा पत्ता कट झाला आहे. अजूनही राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहे.

भाजपाच्या चौथ्या यादीत यांची नावे

मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

घाटकोपर पूर्वमधून प्रकाश महेता यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कुलाब्यामधून राज पुरोहित यांना तिकीट न देता रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बोरीवलीतून सुनील राणे, काटोलमधून चरण सिंग ठाकूर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तुमसरमधून प्रदिप पडोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *