भाजपाकडून बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना संधी

विधानसभा निवडणूक तोंडावर ठेपल्या असल्यामुळे भाजपाने  १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे यादीत नाव असून काही नेत्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज झाले आहेत. विधानसभेपूर्वी गणेश नाईक यांनी  भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाचे विद्यामान आमदार मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीवर मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत पुन्हा मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदावारी देण्यात आली आहे.

गणेश नाईकांचा पत्ता कट ?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला.

नाईकांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाचे विद्यामान आमदार मंदा म्हात्रे नाराज झाल्याचे म्हटलं जात होतं.

गणेश नाईकांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्ष त्यांना उमेदवारी देणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता.

बेलापूरची आमदार मीच असणार असे मंदा म्हात्रे यांनी म्हटलं होते.

गणेश नाईक यांच्या भाजपाप्रवेशाचा मंदा म्हात्रे यांनी विरोध केला होता.

 

 

 

 

Exit mobile version