मध्यावधी निवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मध्यावधी निवडणुकांबद्दल चंद्रकांत पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होतील , असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला.
यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
महाविकासआघाडीचं सरकार किती दिवस चालेल, हे डिसेंबर महिन्यात कळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नसेल तर त्यांनी एनआरसीला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मध्यावधी निवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट दरम्यान महाराष्ट्रातील भाजपचे महत्वाचे नेते दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत.