Fri. Jan 28th, 2022

‘भाजपने दंगली घडवण्याचे षडयंत्र रचले’ – नवाब मलिक

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीमधील दंगलीबाबत भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. दंगली घडवण्याचे षडयंत्र भापनेच रचल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

  नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत दंगलीबाबत भाजपवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, त्रिपुरा हिंसाचार घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तसेच राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगाव येथे आंदोलनाला हिसंक वळण लागले. यातच भाजपने बंदचे आवाहन केले. या बंदच्या माध्यमातून दंगल वाढवण्यात आली. दरम्यान दंगल भडकवण्यामागे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा हात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

 भाजपनेच अमरावतीमध्ये दंगड घडवण्याचे षडयंत्र रचले असून माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा दंगल भडकवण्यामागे हात असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. तसेच या दंगलीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. बंगालमध्येही अशाचप्रकारे लोकांना घाबरवण्यात आले होते. तसेच अमरावतीमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून अमरावतीमधील दंगलीसाठी मुंबईतूनच पैसे पाठवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांची धरपकड

  अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले आहे. माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, महापौरांसह, शिवराय कुलकर्णींना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व नेत्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *