Wed. Jan 26th, 2022

यूपीएचीच रिलायन्सशी बोलणी- प्रसाद

राहुल गांधींनी राफेलवरून केलेल्या आरोपांनंतर भाजपने ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपवरील सर्व आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय. यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचा दावा त्यांनी केला असून आपल्याकडे पुरावे असल्याचंही प्रसाद यांनी म्हटलंय.

राफेलची सर्व माहिती अशा प्रकारे सार्वजनिक करून पाकिस्तानलाच मदत करण्याचा हेतू असल्याचा प्रसाद यांनी आरोप राहुल गांधींवर केला आहे. तसंच राहुल गांधींना सगळं शिकवावं लागेल, असा टोमणाही त्यांनी मारला. राहुल गांधींच्या आरोपांवर देश विश्वास ठेवणार नाही, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *