Jaimaharashtra news

‘ती तर दोन पोपटांची जुगलबंदी’, भाजप प्रवक्त्यांची टीका

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे ‘दोन पोपटाची जुगलबंदी’ असल्याची टीका भाजप प्रवक्ते गिरीश व्यास (BJP) यांनी केली आहे. राज्यातील महत्वाचे मुद्देसोडून दोन्ही नेत्यांनी आधीच ठरलेल्या विषयांवर मुलाखतीत चर्चा केली, असं व्यास म्हणाले. (Sanjay Raut interviews Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांची मुलखात म्हटलं तर सर्व जनतेचं लक्ष याकडे लागलेलं असतं. कारण मुख्यमंत्री जनतेच्या हिताचे कोणते मुद्दे मांडतात, हे लोकांसाठी महत्त्वाचं असतं. मात्र राज्यातील प्रश्न सोडून इतर मुद्यांवर चर्चा करण्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी धन्यता मानली, असा टोला गिरीश व्यास यांनी लगावला.

काय म्हणाले व्यास?

उद्धव ठाकरे अजित पवारांच्या (Ajit Pawar) दबावाखाली काम करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

स्वतःला शिवसेनेचे वाघ म्हणवून घेणारे आता चूप झाले आहे.

उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख आहेत. त्यांनी डरकाळी फोडून बोलायला हवं. पण तसं होत नसल्याचं व्यास म्हणाले. चेहरा रंगवून मिरवणुकीत फिरणारे असे वाघ नागपूरच्या चितारओळीत बघायला मिळतात, अशीच अवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे

Exit mobile version