Fri. Sep 30th, 2022

भाजप मित्र पक्षाला संपवतो – पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशामध्ये आणि राज्यांमध्ये घडत असलेल्या घडामोडी संदर्भात आज बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बिहारमध्ये घडलेल्या राजकीय सत्तासंघर्षावरून पवारांनी भाजपवर निशाणा साधला. ‘भाजपच्या अध्यक्षांनी असं वक्तव्य केलं की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल. नितीशकुमारांची तक्रार आहे, तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतो.

नितीशकुमार हे लोकांमधील मान्यता असलेला नेता आहे. निवडणुकीत भाजप एकत्र येतात आणि मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घेतात. नितीशकुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आज भाजपचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात. परंतु नितीशकुमारांनी टाकलेल पाऊल शहाणपणाचे आहे, असं पवार म्हणाले. ‘धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. असही शरद पवार म्हणाले आहेत.

एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वढवणे योग्य नाही. जर अशी भूमिका घेतली तर लोक हे स्वीकारणार नाही, असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला.

1 thought on “भाजप मित्र पक्षाला संपवतो – पवार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.