Fri. Aug 12th, 2022

पुन्हा एक मठाधिपती BJP चे लोकसभा उमेदवार!

संत साहित्य आणि धर्म या विषयांवर प्रवचन देणारे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांना BJP कडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप पक्षाने विद्यामान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून सोलापूरकरांना BJPने डॉ. सिद्धेश्वर स्वामींच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे.

 

कोण आहे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज?

नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत.

आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रं नेसून स्वामींनी संत साहित्य अन् धर्म यांवर प्रवचन देण्याचं कार्य अंगिकारलं.

त्यांनी धर्मशास्त्रात PhD केली आहे.

कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यांसह अनेक भाषा त्यांना अवगत आहेत.

मात्र BJP ने त्यांना सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात जयसिध्देश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

स्वामींची भूमिका

डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही.

मात्र मोदी सरकारने या देशात चांगली कामं केली आहेत, म्हणून आपण राजकारण्यात प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

येणाऱ्या काळात आपण सोलापुरकरांसाठी चांगली कामं करणार आहोत.

आपल्याला मिळालेल्या उमेदवारीमुळे सर्वत्र स्वागत केलं जात आहे.

ही निवडणूक विचारांची स्पर्धा आहे, व्यतिगत स्पर्धा नाही. त्यामुळे ही कुठलीही लढाई नाही.

विजयाचा गुलाल आपण उधळणार.

 

बैठकांमध्ये आता राजकीय पाठ!

सोलापुरातून डॉ. जयसिध्देश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर होत्याच त्यांनी भक्तांचे बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

मात्र बैठकांमध्ये आता वेगळी परिस्थित दिसू लागली आहे.

ज्या ठिकाणी डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी प्रवचन देत होते, त्याच ठिकाणी ते आता राजकरणाचे धड़े शिकवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.