Fri. Aug 12th, 2022

‘जनतेच्या भरलेल्या टॅक्समधून भाजपच्या जाहीराती’ – अजित पवार

‘जनतेने भरलेल्या हजारो कोटी रुपये टॅक्सचा पैसा भाजप सरकार स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जाहिरातींवर खर्च करत आहे. एवढ्या पैश्यात मोठमोठी विकासकामे होऊ शकतात. भाजपला खोट्या जाहिराती देऊन निव्वळ प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ‘निर्धार परिवर्तन’ यात्रेदरम्यान जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.

‘शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार दाबण्याचा प्रयत्न!’

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नसतो. पण त्यांच्या घोषणा देण्याचं काम सुरुच आहे. गरीब माणून अजून गरीब होत चालला आहे. तर अदानी – अंबानी हे अधिक श्रीमंत होत आहेत.

युती सरकारच्या काळात शाहू – फुले – आंबेडकर यांचा विचार दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जातीयवादी लोक हे करत असून यांना आज आवरण्याची गरज आहे.

तसंच चोपडा कारखान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, असा शब्दही अजित पवार यांनी चोपडावासियांना दिला.

जाहिरातबाजीवर भाजपचा अवाढव्य खर्च?

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमधील पराभवाचा भाजपने मोठा धसका घेतला. मागील 4 वर्षांत सरकारच्या योजनांचा सर्वसामान्यांना कसा फायदा झाला. त्याची यशकथा ‘रिपोर्ताज’च्या माध्यमातून लोकांना दाखविण्यात येईल.

लाभार्थींनी योजनांचा कसा लाभ घेतला, आपले जीवनमान उंचावले. हे दाखवल्याने अन्य लाभार्थींना प्रोत्साहन मिळते आणि योजनांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हे यात दाखवण्यात आले आहे. मराठीतील काही खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या अनुभवावर आधारित ‘टीव्ही रिपोर्ताज’ची निर्मीती केली आहे. त्याला प्रसारित करण्याची मोदी सरकारची योजना आहे.

जाहिराती 60 सेकंदांच्या असणार आहेत.

योजनेकरता 13 कोटी 35 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

योजनेला मंजुरी देण्यात आली असून पुन्हा एकदा ‘होय, मी लाभार्थी’च्या जाहिराती टीव्हीवर झळकणार.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.