Wed. Jun 29th, 2022

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपाची सत्ता?

पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील मतदान पार पडले असून या राज्यातील काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टी, बहुजन समाजपार्टी या पक्षांची कलचाचणी समोर आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले असून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची कलचाचणी समोर आली आहे. या कलचाचणीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुतेक कल चाचण्यांमध्ये भाजपा वरचढ असल्याचा अंदाज समोर आला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची दयनीय स्थिती असल्याचे कलचाचणीनुसार समोर आले आहे.

न्यूज १८ – उत्तर प्रदेशाची कलचाचणी
भाजपा २४०, सपा १४०, बसपा १७, काँग्रेस ४


रिपब्लिक – उत्तर प्रदेशाची कलचाचणी
भाजपा २७०, सपा १८५, बसपा १३, काँग्रेस ६


टीव्ही ९ – उत्तर प्रदेशाची कलचाचणी
भाजपा २१८, सपा १५३, बसपा १९, काँग्रेस ५


हिंदुस्थान टाइम्स – उत्तर प्रदेशाची कलचाचणी
भाजपा २४०, सपा १४०, बसपा १७, काँग्रेस ०


साम टीव्ही – उत्तर प्रदेशाची कलचाचणी
भाजपा २१०, सपा १४५, बसपा १९, काँग्रेस १०


सरासरी – उत्तर प्रदेशाची कलचाचणी
भाजपा २३६, सपा १४१, बसपा १७, काँग्रेस ५


Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.