Wed. Oct 5th, 2022

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी भाजपने आंदोलन केले आहे.

पुण्यात भाजप आक्रमक

पुण्यात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. नवाब मलिकांनी राजीनामा द्या, अशी मागणी भाजपने केली आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी आंदोलनात देण्यात आल्या.

औरंगाबादमध्ये भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

औरंगाबादमध्ये भाजपच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्यांनी आंदोलन केले. नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी भाजप आक्रमक झाली. नवाब मलिक दाऊदचा हस्तक असल्याचे बॅनर घेत यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

नागपूरच्या झाशीराणी चौकात भाजपचे आंदोलन

नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये भाजपचे आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या झाशीराणी चौकात भाजपचे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नागपुरात भाजप कार्यकर्त्याकडून मलिकांचा पुतळा पेटवण्यात आला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असतानाही पोलिसांना चकमा देत मलिकांचा पतुळा पेटवण्यात आला.

मलिकांच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपची निदर्शने

नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा पक्षाने द्यावा या मागणीसाठी सोलापुरात भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटला निदर्शने करण्यात आली. यावेळी नवाब मालिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा आणि ‘गली गली मे शोर है, नवाब मलिक चोर है’ अशा घोषण्या यावेळी करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.