Thu. May 6th, 2021

मुख्यमंत्र्यांचा फोन आला की देवाचा फोन आल्यासारखं काहीजणांना वाटतं- अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून आढावा बैठकी सुरू झाल्या आहेत. आज काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकींचे आयोजन केलं होतं.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या या बैठकींना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस आमंदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अमित देशमुख, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, आमदार भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीचे निकालावर चर्चा झाली असून राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीचा देखील आढावा घेण्यात आला.

तसंच दुष्काळ आणि इतर प्रश्न, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

भाजपचं अनैतिक राजकारण

भाजप अनैतिक राजकारण करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस नेते आणि आमदारांना फोन द्वारे संपर्क करत आहेत.

त्यांनी मला देखील संपर्क करून भाजपात येण्याची ऑफर देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

काहींना मुख्यमंत्री फोन करत आहेत. पण मला वाटत नाही कोणीही पक्ष सोडेल. ‘मुख्यमंत्र्यांना फोन आला म्हणजे देवाचा फोन आला’ असं काहींना वाटतं. मात्र काँग्रेस कार्यकर्ते भाजप च्या वाटेवर जाणार नाहीत. मुख्यमंत्री यापूर्वीच साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करू असं म्हणाले होते, तोच प्रयत्न दिसून येतंय.

विखे-पाटील यांना इशारा

तसंच एका लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर फाजील आत्मविश्वास ठेऊ नका असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांना अशोक चव्हाण यांनी दिला. लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका यांच्यात फरक असतो.

मित्रपक्षांशी बोलण्याआधी पक्षातील लोकांची काय भूमिका हे जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेतली आहे.

आणखी काय म्हणाले चव्हाण?

ज्या ज्या ठिकाणी प्रभाव झाला त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालूकाध्यक्ष यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिले.

शिवसेनेची अयोध्यावारी ही विधानसभा निवडणूक बाकी आहे म्हणून होतेय, निवडणूक झाली की ह्या वाऱ्या थांबतील.

वंचित आघाडीशी आघाडी झाली पाहिजे हा सूर बैठकीत आला, अनेकांनी अनुकूलता दाखवली आहे.

RSS कडील सर्वच काही घेण्यासाकखं नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसशी जागा वाटप बाबत चर्चा झाली नाही. आधी पक्षाच्या लोकांशी चर्चा करत आहोत

शरद पवार यांनी संघाचं केलेल्या कौतुकासंदर्भात चव्हाण म्हणाले, संघाचं सर्वच काही घेण्यासारखं नाही. उदाहरण देण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. पवार काय बोलले यावर टिपणी नाही.  संघाचं अनुकरण आम्ही करणार नाही पण चिकाटीने काम करू

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *