Fri. Jun 21st, 2019

‘भाजपाने माझा वापर केला’ – संजय काकडे

0Shares

भाजपाचे खासदार  संजय काकडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा केली जात आहे. तसेच मध्यतंरी मी भ्रमिष्ट झालो होतो, भाजपाने माझा वापर केला असे त्यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे विचार करावा ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी लाथ मारली तर मला दुसरं घर शोधावचं लागणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

संजय काकडे काय म्हणाले ?

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर अन्याय केला आहे.

मला नेहमी दोघांकडून डावलण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री दोघांचं ऐकून काही निर्णय घेणार असतील तर मला इतर पर्याय शोधावे लागतील.

अजित पवारांचे पुण्यात राजकीय वजन जास्त आहे हे ठाऊक आहे. जर मला डावललं तर मला माझा मार्ग मोकळा होईल असे काकडे यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच चांगली वागणुक मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे मला दुसरं घर शोधावचं लागणार असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: