Wed. May 12th, 2021

‘दुष्काळ, पाणी, रोजगार हे प्रमुख मुद्दे’, भाजपाचे संकल्पपत्र जाहीर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांच्या जाहीर प्रचारसभा सुरु आहेत. आज भाजपचे संकल्पपत्र मुंबईला प्रसिद्द करण्यात आले आहे. वाद्रयांतील रंगशारदा सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, जे पी नड्डा हे उपस्थित होते. हे संकल्पपत्र अतिशय वास्तववादी असून दुष्काळ, पाणी, रोजगार या प्रमुख मुद्दयांवर हे संकल्पपत्र आधारलेले आहे. असे यावेळी सांगण्यात आले आहे.

भाजपाच्या जाहीरनाम्यात हे महत्त्चाचे मुद्दे

दुष्काळ

पश्चिम महाराष्ट्राचे पाणी उत्तर महाराष्ट्रकडे देऊ शकतो.
येणाऱ्या 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करणार
पश्चिमचं पाणी मराठवाडयासारख्या दुष्काळी भागात पोहचवणार
वीज सौर उर्जेद्वारे कृष्णा कोयनाच्या पुराचे पाणी वळवणार
मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणार
कोकणातून वाहणारे पाणी गोदावरीत आणण्याचा प्रयत्न करणार
तेलंगणात वाहणार पाणी, मराठवाड्याला पाणी परत केलं जाईल.

रोजगार

1 कोटी नोकऱ्यांची निर्मिती करणार
1 कोटी महिला बचतगटाद्वारे समूहाने जोडणार
आरक्षणामुळे जागेचा विस्तार करून खुल्या प्रवरगाला 2018 पूर्वी जेवढ्या जागा उपलब्ध होतील.
नोकरीत जागेचा विस्तार करू आणि अधिक लोकांना संधी मिळेल.
अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी,भटके विमुक्त यासाठी प्रभावी उपाययोजना

योजना

2022 पर्यंत प्रत्येक घराला शुद्ध पाणी देणार
सगळ्या रस्त्यांसाठी स्वतंत्र तंत्र सुरू करणार
ग्राम सडक योजनेअंतर्गत 30 हजार किलोमीटर रस्ते करणार
महाराष्ट्राला इंटरनेटने जोडणार
महात्मा फुलें जनआरोग्य योजना लागू करणार
सर्व कामगारांना सामाजिक उपक्रमात आणण्यासाठी प्रयत्न करणार
शहिद पोलीस कर्मचाऱ्यांंच्या कुटुंबाचे पुर्नवसन केलं जाईल
आगामी काळात शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिल स्मारक पूर्ण करू

शिक्षण

शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यात येईल तसेच  क्वालिटी शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.

उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यात भर देण्यात येणार आहे.

शेती

कृषीचा वीज ही सौर ऊर्जेवर आणणार

मागणी

सावरकर, फुले यांना भारतरत्न देण्यासाठी केंद्र सरकारकडे जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *