Mon. Jan 24th, 2022

‘मुंबईमध्ये नालेसफाईत एक हजार कोटींचा गैरव्यवहार’

मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून पहिल्या पावसातच मुंबईत प्रचंड गोंधळ उडाला आहे. यातच नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार अ‍ॅड.आशीष शेलार यांनी बुधवारी केला.

‘मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय,नालेसफाई कधी १०७%..कधी १०४%… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे” पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा,नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा!!’, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.

मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले आहे, नागरिकांच्या घरात घुसले आहे. नालेसफाई १०७ टक्के झाल्याचे दावे करण्यात आले असले, तरी कंत्राटांमध्ये कमिशन घेतल्याचे या परिस्थितीवरून उघड झाले आहे, असा आरोप शेलार यांनी केला.

मुंबईत सुमारे २५२.७४ किमी लांबीचे एकूण १७० मोठे नाले, छोटे नाले, गटारे आणि नलिकांच्या सफाईसाठी दरवर्षी सुमारे १५० कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो. नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात, पण किती गाळ काढला, त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला, त्याचे सीसीटीव्ही फुटेज, असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत, असे शेलार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *