Sun. Jul 12th, 2020

आशिष शेलारांनी ‘त्या’ वक्तव्यावरुन मागितली माफी

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या त्या व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उच्चार करत घणाघात केला होता.

आशिष शेलारांचा माफीनामा

मी माझ्या विधानात कुणाचाही उल्लेख केला नव्हता. तरी देखील माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, या शब्दात शेलारांनी दिलगीरी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला नाही. ती आमची संस्कृती नाही, असंही शेलार म्हणाले.

काय म्हणाले होते शेलार ?

सीएए आणि एनआरसी हा कायदा केंद्र सरकारचा कायदा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे?, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का ? असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होतं.

आशिष शेलारांनी रविवारी नालासोपऱ्यातील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, CAA आणि NRC राज्यात लागू होऊ देणार नसल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होतं.  शिवसेना ज्या प्रकारे रंग बदलत आहे, ते पाहून रंगबदलू सरडाही आत्महत्या करेल, असंही आशिष शेलार म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *