Mon. Aug 15th, 2022

…त्यावेळी शिवसेनेचं पर्यावरण प्रेम कुठं गेलं होतं – आशिष शेलार

वृक्षतोडीसाठीची परवानगी देताना शिवसेनेचं पर्यावरण प्रेम कुठं गेलं होतं, असा संतप्त सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेचा आज 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला गेला. या अर्थसंकल्पातून मागील ५ वर्षात २५ हजार झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती या अर्थसंकल्पातून देण्यात आली.

या मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. याबाबत आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे.

काय म्हणाले आशिष शेलार ?

मुंबई महानगरपालिकेने मागील ५ वर्षात २५ हजार झाडं तोडण्यासाठीची परवानगी दिली असल्याची माहिती दिली.

ही झाडं तोडण्यासाठीची परवानगी देताना शिवसेनेचं पर्यावरण प्रेम कुठं गेलं होतं, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.

इतकंच होत तर मग हट्टाने मेट्रो कारशेडचे काम का थांबवलं, असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईकरांचे ३०० कोटींचे नुकसान का केलं, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

तसेच मुंबई पालिकेच्य अर्थसंकल्पावरील अनेक मुद्द्यांवर आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.