Jaimaharashtra news

‘गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्यात याव्या’; भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी

भाजप नेते आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणीकेली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार येथून चाकरमानी आपल्या गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने ७२ अतिरिक्त गाड्या सोडण्याची घोषणा केली. तसेच बुकिंग सुरू होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत, याकडे शेलार यांनी नव्या रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

अधिकच्या बुकिंग सुविधा आणि अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकरसुद्धा उपस्थित होते.

 

Exit mobile version