Jaimaharashtra news

भाजप आमदार अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

 
मुंबई: मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिक रहिवाशांकडून विरोध करण्यात आला. यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्या ठिकाणी पोहचून कारवाईला विरोध सुरू केला. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
याप्रकरणी आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘ठाकरे सरकारची मोगलाई. शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी  ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं’, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

कुरार मेट्रो स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या मालाड पूर्व येथील सुमारे १५० रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिकेनं घरे रिकामी करण्यासंदर्भात नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर या घरांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. या प्रकरणावरून अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Exit mobile version