Fri. Aug 12th, 2022

‘…तर बाळासाहेब वरून एक फटका मारतील’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकीकडे भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करत टीका केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत गेल्या ६० वर्षात काँग्रेसने केलेल्या कामावरच देशाचा कारभार सुरु असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे गेली, पण पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधीपर्यंत, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांच्या सरकारपर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर हा देश उभा राहिलेला दिसतो. या देशात अनेक योजना, प्रकल्प दिसत आहेत. देशाची अर्थव्यवस्था आपण पाहिली. त्याच मागच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे, मागची सात वर्षेसुद्धा! हे कोणालाही नाकारता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देताना ‘पंतप्रधान त्यांची सूचना मान्य करतील, मी त्यांच्या वतीने निरोप देतो. पण त्यांनी जरा हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर शांतपणे बसावं, डोळे मिटावे आणि तुमचंही मत हेच आहे का असं विचारावं. त्यावेळी ते वरुन एक थोबाडीत मारतील’,असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.