Thu. Jun 17th, 2021

‘सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’

सांगली: मराठा आरक्षणावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे. या सरकारने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ४१३ जणांच्या नियुक्त्या रखडवल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री आपल्या मुलाला कॅबिनेट मंत्री बनवण्यात जशी तत्परता दाखवतात तशीच त्यांनी या ४१३ जणांच्या नियुक्तीबाबत दाखवावी. अन्यथा सरकारविरोधात आंदोलन केले जाईल असा इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना दिला.

‘सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाची ठाकरे सरकारने पाठराखण केली नाही.या सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही’, आसदेखी; पडळकर यावेळी म्हणाले. तसेच मराठा आरक्षण रद्द होण्याला ठाकरे सरकारच जबाबदार आहे अशी टीकाही पडळकर यांनी केली आहे.

मराठा आरक्षण रद्द झाले हे वेदनादायी आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. यामुळे अन्य प्रवर्गातील ४१३ जणांच्या नियुक्त्या रखडल्या असून ज्या तत्परतेने आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केले,याच तत्परतेने मेगा भरतीतील ४१३ विद्यार्थ्यांची नियुक्ती कधी करणार असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात ४१३ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्या, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *