Thu. Jun 17th, 2021

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ‘माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा मुंडेंवर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

धनंजय मुंडे यांची भावनिक पोस्ट

ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या @Pankajamunde ताई. अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *