Thu. May 6th, 2021

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं निधन

डहाणू विधानसभेचे भाजपचे माजी आमदार आणि पालघर माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचा मध्यरात्रीच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पास्कल धनारे यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून गुजरात मधील वापी येथील रेनबो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

फडणवीस सरकारच्या काळात धनारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या डहाणू या बालेकिल्ल्यात निवडून आले होते. आमदार असताना पास्कल धनारे यांच्याकडे भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष हे पद देखील होतं. आज पालघर जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचं तर काल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचं कोरोनाने निधन झाल्याने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *